संग्रामपूर तालुक्यामध्ये राशन वितरणाला मशीनचा खोडा शिधा पत्रिका धारका सह स्वस्त धान्यदुकानदार त्रस्त
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] स्वस्त धान्य दुकानदार पुर्वी २ जी मशीन व्दारे शिधा पत्रिका धारकांचे थंब घेऊन धान्य वितरण करीत असतांना नेटवर्क अभावी त्रस्त असल्याची ओरड होत असतांना शासनाने मोठा गाजावाजा करुन २ जी वरुन ४ जी नविन मशीना स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत केल्या त्यात शिधापत्रिका मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला केवायसी अनिवार्य करण्यात आले मात्र नेटवर्क अभावी बहुताश शिधा पत्रिका धारकांची केवायसी झाली नाही संग्रामपुर तालुका हा आदिवासी बहुल असुन शिधापत्रिका धारक कुटुंब मोल मजुर असल्याने महागाईत स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळाल्यास त्यांना सहारा होतो परंतु नेटवर्क मध्ये तांत्रीक दोष अभावी थंब लागत नसल्याने स्वस्तधान्य दुकानदार यांच्या कडे धान्यवितरण मशीन शोभेची वस्तु झाली आहे तालुक्यातील गाव निहाय स्वस्त धान्य वितरण करण्यासाठी वितरण मशीनचा खोडा असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्वस्त धान्य दुकानात धान्यासाठी चकरा मारुन हैरान झालेले शिधापत्रिका धारका कडून उमटत आहे तर स्वस्त धान्य दुकानदारावर नागरिकांना प्रश्नाचा भडीमार करित असुन नागरिकांना स्वस्त धान्यदुकानदार तोंड देऊ देऊ वैतागले आहे धान्य वितरण मशीन नेटवर्क अभावी बंद असल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना स्वस्त धान्य दुकानदारांना करावा लागत असल्याने शासन अन्नपुरवठा विभागाने धान्यवितरण प्रणाली मशीन सुव्यवस्थीत सुरु व्हाव्या यासाठी वरिष्ठा कार्यालयकडे पाठ पुरावा करावा किवा स्वस्त धान्यदुकानदारांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याचे आदेश अन्नपुरवठा विभागा तहसिल कार्यालय कडून देण्यात यावे अशी मांगणी त्रस्त शिधा पत्रिका धारक नागरिकां कडून जोर धरत आहे