घटनामहाराष्ट्र
संत रुपलाल महाराज मंदिराचे भक्तनिवास सह परिसरातील बांधकाम तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन सकल बारी समाजाच्या वतीने निषेध आंदोलन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बारी समाजाचे आराध्य दैवत वैराग्यमूर्ती श्री संत रुपलाल महाराज यांचे मंदिर बारी समाज विकास ट्रस्ट पुणे (दिघी) व समस्त बारी समाजाने लोकवर्गणीतून मंदिर,भक्त निवास,भोजन कक्ष,स्वयंपाक गृह,शौचालय इत्यादी बांधकाम दोन वर्षांपूर्वी केले होते. दरम्यानच्या काळात संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले .परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी तेथील लोकप्रतिनिधी कंटकांनी गावगुंडांना हाताशी धरून भक्तनिवास,भोजन कक्ष,स्वयंपाक गृह,शौचालय इत्यादी तोडफोड केल्यामुळे समस्त भारतातील सकल बारी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत सदर घटनेचा निषेध करीत भक्त निवास परिसरातील बांधकाम तोडणाऱ्या संबंधीतांवर कारवाई करा अशी मांगणी संग्रामपुर तालुक्यातील सकल बारी समाज बांधवांनी तहसिलदार यांच्या कडे निवेदन व्दारे केली आहे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि सदर संत रुपलाल महाराज मंदिर परिसरातील भक्त निवास भोजन सभागृह शौचालयची तोडफोड केल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी कंठक व गावगुंडांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी.अन्यथा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातुन प्रा मोहन रौंदळे , श्याम डाबरे नारायण ढगे सुनील बोडखे पांडुरंग ढगे सुभाष हागे पंकज मिसाळ ,नितीन हागे, बळीराम धुळे ,किशोर रौंदळे , वासुदेव घायल प्रशांत दामदर नंदु रेखाते , सतिष टाकळकर ,सह बारी समाज बांधव यांनी दिला आहे