राजकीय
संदीपदादा शेळके यांच्या प्रचार रॅली ला जामोदात उस्फुर्त प्रतिसाद
बुलढाणा :- अपक्ष उमेदवार संदीप शेळके जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे करीत आहेत. त्यांना सामान्य मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. आज दि १८ एप्रिल रोजी जामोद, येथे संदीपदादा शेळके यांचा रोड शो संपन्न झाला .यावेळी गावातील प्रमुख मार्गाने प्रचार रँली काढत संदीप दादा शेळके यांनी गावातील जनतेसोबत संवाद साधला
यावेळी संदीप दादा शेळके यांनी मतदारांना आश्वासन दिले की जिल्हाच्या विकासाचे व्हिजन हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा राहील जनतेने लोकसभेत पाठवल्यानंतर खासदार म्हणून नव्हे तर तुमचा सेवक म्हणून नोकर म्हणून विश्वस्त म्हणून मी काम करेल असा शब्द जनतेला दिला