सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनिल शेळके आज मेहकरात
सिनेमार्क टॉकीजला देणार भेट ; प्रेक्षकांशी साधणार संवाद

बुलढाणा : राज्यभर गाजत असलेल्या ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते सुनिल शेळके ८ जानेवारी रोजी मेहकरला भेट देणार आहेत. दुपारी अडीच वाजता सिनेमार्क टॉकीजमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी अख्खे आयुष्य पणाला लावणाऱ्या ज्योतिबा फुले अन् सावित्रीआई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट सत्यशोधकची निर्मीती करण्यात आली. या कलाकृतीद्वारे ज्योतिबा फुले, सावित्रीआई फुले या दाम्पत्याचे कार्य घराघरात पोहोचावे, अशी तळमळ अनेकांची आहे. ही तळमळ लक्षात घेऊन सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनिल शेळके हे राज्यभरातील मंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. सत्यशोधक रिलिज झाल्यापासून ते विविध टॉकीजला भेटी देत आहेत. प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. ठाणे, पालघर, बुलडाणा, सिंदखेडराजा यासह इतरही शहरांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. मेहकर येथील सिनेमार्क टॉकीजला ते दुपारी २.३० वाजता भेट देणार आहेत. यावेळी ते मेहकर परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींसह प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत