सद्भावना सेवा समिती काढणार भारत गौरव स्पेशल ट्रेन यात्रा – राधेश्याम चांडक
जगन्नाथ पुरी, गंगासागर, काशी वाराणसी, अयोध्या, मथुरा वृंदावन धाम चा तीर्थयात्रेत समावेश
बुलढाणा :- भाविक भक्तांची तीर्थस्थानाला भेटी देण्याची आंतरिक इच्छा असून तीर्थयात्रा करता येत नाही ही गरज लक्षात घेऊन सद्भावना सेवा समिती दरवर्षी विशेष रेल्वे यात्रा आयोजित करणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दहा दिवसाची दिव्य संकल्प रेल्वे यात्रा परमपूज्य सुश्री अलका श्रीजी यांच्या सानिध्यात निघणार आहे. 800 भाविक भक्त यामध्ये संपूर्ण विदर्भातून सहभागी होतील. या संदर्भात चर्चा करण्यासाठी अकोला येथे नुकतेच सभेचे आयोजन करण्यात आले. सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक सभेचे अध्यक्षस्थानी होते. विदर्भाच्या संत श्री अलका श्रीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेला लाभली.सभेच्या प्रारंभी कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा यांनी सु श्री अलका श्रीजी चे स्वागत केले. अकोलाचे हरीश मानधना यांनी भाईजी चे स्वागत केले. व्यासपीठावर राजनांदगाव येथील मनोज डागा यांचे स्वागत सिद्धार्थ शर्मा यांनी केले. नागपूरचे मनमोहन मर्दा यांनी दिव्य संकल्प यात्रेविषयी सविस्तर माहिती दिली. आयोध्या येथे सुश्री अलका श्रीजी चे दिव्य सुंदरकांचे आयोजन केले असून मुख्य यजमान यवतमाळ चे घनश्याम बागडे आणि तळेगाव नागपूरचे नारायणदास राठी, रामेश्वर जी दिलीप कुमार जी राठी परिवार आहेत.दिव्य संकल्प यात्रेचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. संत श्री अलका श्रीजी यांनी संकल्प यात्रेला शुभकामना दिल्या व राधेश्यामजी चांडक यांनी केलेल्या संकल्प चे कौतुक केले. असेच कार्य भाईजींच्या हस्ते भविष्यात होत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. नांदगाव येथील मनोज डागा यांनी भाईजानच्या कार्याची प्रशंसा केली व आयोजन च्या मार्गदर्शनात भारत गौरव स्पेशल रेल्वे यात्रा अबूतपूर्व होईल यात शंका नाही असे गौरव उद्गार काढले. अध्यक्ष भाषणात भाईजी यांनी सद्भावना सेवा समितीने गेल्या 25 वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समितीची स्थापना व वाटचाल यावर प्रकाश टाकला. दरवर्षी स्पेशल रेल्वे यात्रा निघाली पाहिजे असा जो संकल्प केला होता तो या यात्रेने पूर्ण होत आहे या यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाईजींनी केले.वेलकम इन हॉटेलचे प्रमुख विवेक मंत्री यांनी अलका श्रीजी चे विशेष स्वागत केले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाश चंद्र पाठक सचिव सदभावना सेवा समिती बुलढाणा यांनी केले. सभेला संदीप केला आर्वी, यवतमाळचे घनश्याम बागडी, संतोष महेंद्र, डॉ परमेश्वर लढा, मनमोहन मरदा नागपूर, अशोक राठी दिग्रस, संतोष गुडघेला नांदेड, राधेश्याम भन्साली, गिरीश तोष्णीवाल, हरीश मानधना अकोला, सुशील सारडा अमरावती, गोपाल राठोड शेगाव, अजय सिंगर, चंपालाल शर्मा, तिलकचंद चांडक, सुरेश गटानी, उमेश मुंदडा, सिद्धार्थ शर्मा, मधुकर गायके, पुरंदर शर्मा, प्रकाशचंद पाठक बुलढाणा पत्रकार बंधू पैकी विलास खंगरे, आशिष पाईकराव अकोला वेलकम हॉटेलचे प्रमुख विवेक मंत्री हर्ष मंत्री, वंदना मंत्री, विजयकुमार नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी हरिश मानधना व सहकारी यांनी परिश्रम घेतले