महाराष्ट्रविशेष बातमी
सन उत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणुन तामगाव पोस्टे हद्दितील गावात पोलीसांचा रुट मार्च
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] मुसलीम समाज बांधवांचा पवित्र महिणा रमजान सुरु आहे तर हिंन्दु समाज बांधवांची याच महिण्यात होळी सन त्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुक या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या आदेशान्वये तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गाव पातुर्डा बु. व कवठळ या गावामध्ये तामगाव पोलीस स्टेशनचे सपोनि राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात आगामी लोकसभा निवडणुक, रमजान ईद, होळी उत्सवाच्या पार्श्व- भूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पातुर्डा व ग्राम- कवठळ या गावामधील मिश्र वस्ती, तसेच संवेदनशील मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन- तामगांव चे ठाणेदार सपोनि- राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक दिपक सोळंके, जिवन सोनवणे, पातुर्डा चौकी बिट जमदार पोहेकॉ दयाराम कुसुंबे, ग्राम- कवठळ चे बिट जमदार अनिल सुशिर , गोपनीय अंमलदार मनिष वानखेडे , जमादार खंडागळे व पो.स्टे चे 15 पोलीस अंमलदार , पो.स्टे जळगांव जामोद चे पोलीस उपनिरीक्षक – वाघोदे ,व 03 पोलीस अंमलदार,पो.स्टे. सोनाळा चे 03 पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालय बुलढाणा येथुन आलेले सी.आय.एस.एफ.बटालियनचे 03 अधिकारी 47 अंमलदार , 35 होमगार्ड रुटमार्च दरम्यान उपस्थित होते.