महाराष्ट्रविशेष बातमी
सर्वागिण विकाससाठी उच्च शिक्षण अनिवार्य तहसिलदार योगेश्वर टोम्पे

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] शहरात सुविधा असतात तर ग्रामीण खेडेगावात सुविधांचा अभाव असतो आता सर्वत्र शिक्षणाचे दालन आहे घटनेने सर्वाना शिक्षणाचा मौलीख अधिकार बहाल केले आहे शिक्षण घेण्यासाठी ईच्छाशक्ती व मनाची एकाग्रहता वाचनाची आवड यात खरे उतरल्यास शिक्षण क्षेत्रात यश हमखास मिळतो यात गरिबी आड येता कामा नये घटनाकार या महात्माचे आदर्श समोर ठेवुन त्यांचे गुण अंगिकारा ग्रामीण भागातील युवकांनो वाचाल तरच वाचाल सर्वागिण विकासासाठी उच्च शिक्षण अनिवार्य असे
प्रतिपादन तालुक्यातील जस्तगाव एक हजार लोकसंख्येचे गावातील विहारा मध्ये नालंदा अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करतांना तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी केले ते पुढे म्हणाले लहान खेडेगावातुन सामाजीक कार्यासाठी अमोल भिलंगे या युवकास आदर्श महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल तालुक्यासाठी अभिमानास्पद असुन त्यांचे कौतुक केले व्यासपीठावर सामाजीक कार्यकर्ते भाऊ भोजने , अभयसिंह मारोडे , वरवट बकाल सरपंच सौ प्रतिभा विजय इंगळे , जस्तगाव प्रभारी सरपंच कपिल डोसे, तालुका कृषि अधिकारी अमोल बनसोड, सहाय्यक पो उप निरिक्षक सोनोने , अड विश्वजित वानखडे , मनार्डी सरपंच नंदु पुंडे , बाळा साहेब डोसे, सुमित डोसे, निखिल डोसे,आदिची उपस्थिती होती यावेळी कृषि अधिकारी अमोल बनसोड व पीएसआय सोनोने यांनी सामाजीक कार्या सह व स्पर्धा परिक्षेत यशासाठी कशी तयारी करावी यावर विस्तृत मार्गदर्शन केले तर भाऊ भोजने, अभयसिंह मारोडे , सरपंच प्रतिभा इंगळे यांची समायोचित भाषणे झालीत संचालन प्रा सतीष खंडेराव यांनी केले तर प्रा संघपाल गव्हांदे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी धम्मक्रांती नवयुवक मंडळ , यशोधरा महिला मंडळ व जस्तगाव ग्रामस्थांनी प्रयत्न केले

सामाजिक कार्यासाठी आदर्श महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सामाजीक कार्यकर्ते अमोल भिलंगे यांचा सत्कार
एक हजार लोकसंख्या असलेल्या जस्तगाव छोट्या खेडे गावातील सामाजीक कार्यकर्ते अमोल शामराव भिलंगे या युवकाला नुकतेच सामाजीक कार्यासाठी आदर्श महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सामाजीक कार्यकर्ते भाऊ भोजने ,सरपंच प्रतिभा विजय इंगळे , पळशी झाशी माजी सरपंच अभयसिह मारोडे , वंचीत युवा आघाडी तालुकाध्यक्ष आशिष धुंदळे यांनी सामाजीक कार्यकर्ते अमोल भिलंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला