घटना

सावळी येथील जि प शाळेची जिर्ण भिंत पावसाने कोसळली वर्ग १ ते ४ पर्यत शाळा भरणार एकाच खोलीत

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सावळी जिल्हा परिषदच्या शाळा असुन विद्यार्थी संख्या ३८ आहे दोन शिक्षक कार्यरत आहेत दोन बांधकाम १९५३ स्थापनेच्या वेळी झालेले असुन खोल्या बांधकामाला ७१ वर्ष झाले गेल्या दोन तिन दिवसा पासुन सतत पाणी सुरु असुन दि २ सप्टेंबर च्या रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस झाला ७० वर्षापुर्वी बांधलेल्या सावळी जि प शाळेच्या खोल्या जिर्ण झाल्या मुसळधार अतिवृष्टी झाल्याने पावसाचे पाणी जिर्ण खोल्याच्या भिंती मध्ये मुरुन दि २ सप्टेंबरच्या मध्यरात्री भिंत कोसळली भिंत मात्र जिवीत हानी झाली नाही अनर्थ टळला शाळेच्या वेळात जर भिंत कोसळली असती तर त्याचा विचार न केलेला बरा शिक्षण विभागाकडे नविन शाळेच्या खोल्या बांधकामला मंजुरी देण्यासाठी शालेय व्यवस्थापक समितीने मांगणी केली शाळा खोल्या मंजुरही झाल्या परंतु अदयापही मंजुर शाळा खोली बांधकामा सुरु न झाल्याने त्यात जुन्या जिर्ण खोलीची भिंत पडल्याने वर्ग १ ते ४ पर्यत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना एकाच खोलीत बसवुन विद्यार्थ्याना शिक्षकांना शिकविणे शिवाय पर्याय नसल्याने शिक्षकांनी पेच पडणार कि कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्याना शिकवावे असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे परिणामी विद्यार्थ्याच्या शैक्षणीक नुकसान होणार असल्याने शिक्षण विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी सावळी जि प शाळेच्या खोली बांधकामा विना विलंब सुरु करण्याचे आदेश द्यावे व विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणीक नुकसान थांबवणे गरजेचे आहे अशी मांगणी शालेय व्यवस्थापण समिती पालक वर्ग व सावळी ग्रामस्थां कडून जोर धरत आहे
बॉक्स
स्थानिक प्रशासना कडून पंचनामा

७० वर्षा पुर्वी बांधलेल्या सावळी जि प शाळेच्या खोल्या बांधकाम झालेले असल्याने दि २ सप्टेंबर च्या रात्रीच्या पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने त्यात खोली जुनी जिर्ण झाल्याने भिंत कोसळली सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व वरिष्ठाना अहवाल सादर केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak