राजकीय
सावळी सरपंच पदी सारिका गजानन अरबट अविरोध तर उपसरपंच पदी लिला अनिल भिवटे
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सावळी ग्रा पं सरपंच पदी सौ सारिका गजानन अरबट अविरोध निवड झाली तर उपसरपंच पदी लिला अनिल भिवटे याची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली
तालुक्यातील सावळी सह ४ गावात यापुर्वी झालेल्या ग्रा पं निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण सोडत मध्ये सरपंच पद आरक्षित जागे वर उमेदवार नसल्याने सावळी सरपंच पदाची निवडणुक झालीच नसल्याने सरपंच पद रिक्त होते निर्वाचन विभागा करवी ईश्वर चिटटी काढण्यात आली त्यात सावळी सरपंच पद ना मा प्र महिला राखिव निघाल्याने तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांच्या आदेशान्वये निवडणुक अध्यासी अधिकारी यु पी बुरजे यांच्या मार्गदर्शनात सावळी ना मा प्र राखीव ग्रा पं सरपंच पदासाठी नुकतीच निवडणुक घेण्यात आली सरपंच पदा साठी सौ सारिका गजानन अरबट यांचा एकमेव अर्ज असल्याने सावळी ग्रा पं सरपंच सौ सारिका गजानन अरबट यांची अविरोध निवड तर उपसरपंच पदी लिला अनिल भिवटे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणुक अध्यासी अधिकारी यु पि बुरजे यांनी केली याप्रसंगी नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंच यांचा सावळी ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सर्व ग्रा पं सदस्य सचिव राजकुमार काळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते