स्पर्धेच्या काळात विद्यार्थी टिकावे यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणे गरजेचे प्रा. राजेश पाटिल ताले

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] स्पर्धेच्या काळात विद्यार्थी टिकावे यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. राजेश पाटिल ताले यांनी पीएम श्री मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष,राष्ट्रीय व्याख्याते प्रा.राजेश पाटिल ताले उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध छंद जोपासावेत,शाळेतील शिक्षण आपल्याला परीक्षेत यशस्वी करेल पण जोपासलेलेलं छंद आपल्याला जीवनाच्या शाळेत यशस्वी करतील.याकरिता आईवडिलांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांना वाव द्यावी तसेच त्या सुप्त गुणांचे संवर्धन करावे असे आव्हान मार्गदर्शन करतांना प्रा.राजेश ताले यांनी केले
तालुक्यातील सोनाळा येथील जिल्हा परिषद विद्यार्थी उच्च प्रा मराठी मुलांची शाळेत पीएम श्री मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला सदर शाळेत पीएम श्री अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला बोपटे , प्रमुख अतिथी सोनाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनाळा चे मुख्याध्यापक पवार,स्वामी विवेकानंद ग्रुप चे उपाध्यक्ष प्रतिक ताले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.पीएम श्री उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद मुलांची शाळा सोनाळाचा सर्वांगिक विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, येणाऱ्या काळात शिक्षक ,शालेय व्यवस्थापन समिती पालक वर्ग व नागरिकांच्या सहकार्याने आमची शाळा बुलडाणा जिल्ह्यातील आदर्श शाळा बनवू असा विश्वास आश्वासन मुख्याध्यापिका शिला बोपटे यांनी प्रस्ताविकातून दिला यावेळी विद्यार्थ्यार्थी , शिक्षक वृंद , शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्ग उपस्थित होते