राजकीय

हजारोंच्या उपस्थितीत संदीप शेळके यांचा नामांकन अर्ज दाखल

ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी है- संदीप शेळके

बुलढाणाः हजारोंच्या उपस्थितीत वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना त्ो म्हणाले की, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. खासदार झाल्यावर त्ुामचा सेवक, विश्वस्त म्हणून काम करेन! अपक्ष असलो तरी अनेक दृश्य अदृश्य हात आपल्यासोबत असल्याचेही संदीप शेळके म्हणाले. पुढे त्ो म्हणाले की, जनत्ोच्या हिताची प्रामाणिक तळमळ असेल, हेत्ूा स्वच्छ असेल तर जनता त्ुाम्हाला प्रचंड पाठींबा देत्ो, आजचा विराट जनसमुदाय त्याची साक्ष आहे.आतापर्यंत खासदारांनी विकासाच्या नावावर चॉकलेट देण्याचं काम केलं. जिल्हा बिघडवण्याचा काम केलं, अशा निष्क्रिय खासदाराला हद्दपार करा, मला जनत्ोने सेवेची संधी दिल्यास मी खासदार म्हणून नव्हे तर त्ुामचा नोकर म्हणून त्ुामचा सेवक म्हणून त्ुामचा विश्वास म्हणून काम करेल. मी अपक्ष म्हणून जरी उमेदवारी अर्ज दाखल करीत असलो तरी आपल्याकडे विकासाचे पक्के व्हिजन आहे,जिल्ह्याची जनता परिवर्तन मागत आहे असे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्प संदीप शेळके यांनी केले. आज 3 एप्रिलच्या मुहूर्तावर संदीप शेळके यांनी बुलढाणा लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला, त्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदाना शेजारील टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानात जाहीर सभेला संदीप शेळके यांनी संबोधित केले यावेळी त्ो बोलत होत्ो. पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की, अनेक दृश्य अदृश्य हात आपल्यासोबत आहेत. काही लोकांवर प्रचंड दबाव आहे, मात्र दबाव झुगारून लोक आता परिवर्तन मागत आहेत.इथे जमलेली गर्दी हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असे संदीप शेळके म्हणाले. तसेच जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी आसूड ओढताना म्हणाले की आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी आपला जिल्हा 50 वर्षे मागे नेला असून वन बुलडाणा मिशन ही पहिली चळवळ आहे जिथे जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्‌‍यावर चर्चा होत्ो. आपल्याला जिल्ह्याचा सर्वांगीण सर्वव्यापी विकास करायचा आहे. यावेळी विद्यमान खासदार जाधवांवर संदीप शेळके यांनी टीकेची तोफ डागली. त्यांनी संसदेत सोयाबीन कापसावर प्रश्न विचारले नाही, जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल त्ो बोलत नाहीत.त्यांना जिल्ह्याचे प्रश्नच माहीत नाहीत. केवळ भूलथापा मारायचा, भावनिक राजकारण करायचे आणि आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घ्यायची असेच राजकारण आतापर्यंत त्यांनी केलं.त्यामुळे गेल्या 15 वर्षात जिल्हा 50 वर्षे मागे नेण्याचं पाप त्यांनी केल्याचे संदीप शेळके म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहावर देखील संदीप शेळके यांनी भाष्य केले. भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रमुखांनी उमेदवारी अर्ज भरला, शिंदे गटाचे मंत्री त्यांना त्यांची औकात दिसून येईल म्हणतात, भाजपच्या नेत्याची औकात काढण्यापर्यंत मजल गेल्यावर भाजपवाले खासदाराला मदत करतील का? असा सवाल त्यांनी केला. महायुती आणि महाविकास आघाडीत आलबेल नाही,त्यांची लढाई सत्तेसाठी त्यांच्या स्वतःच्या खुर्चीसाठी ,स्वार्थासाठी आहे आपली लढाई ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे असे संदीप शेळके म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak