रोज़गार

१० वर्ष सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगाराला कमी केल्याने न्याय हक्कासाठी कंत्राटी कामगार दामोदर यांचा विद्युत वितरण कार्यालय समोर कुटुंबा सह आमरण उपोषणाचा ईशारा

संग्रामपुर (प्रतिनिधी) तालुक्यातील उकडगांव येशील रहिवासी कंत्राटी कामगार प्रदिप हामोदर याने गेल्या १०, वर्ष ईमाने इतबारे संग्रामपुर (उपविभाग) कार्यालया अंतर्गत कंञाटी कामगार म्हणून रात्र दिवस सेवा दिली व ८५% जागा कमी करण्याचा G.R. निघाला असता त्यामध्ये त्यांना कामावरुण कमि करण्यात आले. परंतु आता मात्र संग्रामपुर (सेंटर) येथे कंत्राटी टेक्निशियन म्हणुन एक जागा खाली होती. त्या जागेवर १० वर्षा पासुन कंत्राटी कामगार म्हणुन सेवा दिल्याने याचा विचार निवड अधिकारीने प्राधान्यांने करुन कंत्राटी टेक्निशियन प्रदिप दामोदर यांची नियुक्ती करने गरजे असतांना केवळ जातीमुळे त्यांना कामा वरुन कमी करुन त्या ठिकाणी शिक्षण पाञता नसतांनाही या दुसऱ्याची ऑर्डर काढल्या गेली. अधिकाऱ्याने चिरिमिरी घेऊन आर्थीक लाभासाठी कामावरुण कमि केल्याचा आरोप संबंधीत कंत्राटी कामगार दामोदर ने विज वितरण कार्यालय संग्रामपुर कायर्यालयाला दिलेल्या निवेदनातून केला आहे. जुन्या कंत्राटी कामागाराला कामावरूण कमि करता येत नाही असा नियम आहे असतांनी १० वर्ष सेवा देणान्या कंत्राटी कामगाराच्या दिलेल्या सेवेची चौकशी करूण पुर्वरत कामावर रुजु करूण न्याय द‌यावा, अन्यथा १ ऑक्टोबर पासुन संग्रामपुर उपविभाग कार्यालयासमोर परिवारासह आमरण उपोषण करण्याचा ईशारा कंत्राटी कामगार प्रदिप दामोदर याने निवेदना द्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak