आरपीएफ रंजन तेलंग यांनी भेटवल्या आई आणि मुली
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] आरपीएफ म्हटले की अवघ्या महाराष्ट्राला प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांचं नाव परिचित च आहे दिनांक 26/06/24 ला बचत गटाच्या कर्जा च्या टेन्शनने एक महिला चाळीसगाव वरून टेन्शन ने निघून गेल्या.चाळीसगाव पोलीस ठाण्यात 58/2024नुसार मिसिंग ही दाखल करण्यात आली . त्या शेगाव ला आल्या असतील या वरून त्यांची मुलगी जावई आणि नातेवाईक शेगाव ला आले त्यांनी ड्युटी करून परत जाताना दिसलेले रंजन तेलंग यांना हकीकत सांगितली त्यावरून त्यांनी दिलासा देत त्या भेटतील म्हणून सांगितले आणि cctv चेक केले तर त्या दिसुन आल्या रंजन तेलंग यांनी लगेच त्यांच्या खाजगी कार ने वारकरी निवास गाठले तिथे त्यांच्या मुखबिर ने वर्णन दिलेली महिला 15 मी ने येथून गेली सांगितले रंजन तेलंग यांनी लगेच गाडी मंदिराकडे वळवली आणि योगायोग हरवलेली महिला त्यांच्याच कार समोर आली,मुलीने आईला बघताच गळयात पडून हंबरडा फोडला आणि नंतर तेलंग यांनी त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून कायदेशीर कार्यवाही करत त्या महिलेचे समुपदेशन करून त्यांना परिवाराला सुपूर्दगी पंचनामा बनून ताब्यात दिले, रंजन तेलंग यांच्या कामगिरी ने परिवाराने त्यांचे सरळ पायच पकडले आणि धन्यवाद देत ओल्या डोळ्याने ते आपल्या आईला घेऊन परत गेले रंजन तेलंग यांच्या मर्मष्पशी कामगिरीने पुन्हा आरपीएफ विभागाचे नाव उंचावले