डॉ.संजय कुटे यांनी आपला मतदारसंघ उत्कृष्ठ बनवला आता महाराष्ट्र सुंदर बनवण्यासाठी त्यांना विजयी करा.-केंद्रीय मंत्री.भूपेंद्र यादव
मातृशक्तिच ही निवडणुक एतिहासिक करनार- आ डॉ संजय कूटे
महायुतीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार आ डॉ संजय कुटे यांचा हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल
बुलडाणा [प्रतिनिधी ] जळगाव जा विधान सभा मतदार संघ या विभागाचे लोकप्रिय विद्यमान आमदार डॉ संजयभाऊ कुटे हे आहेत्तच पण ते नेतेही आहेत त्यांनी जनतेने सतत चार वेळा निवडूकीत मतदान रुपी आर्शिवाद दिला सलग २० वर्षा पासुन जनतेची सेवा करित आहे या २० वर्षात आ डॉ कुटे यांनी आपला मतदारसंघाचं कायापालट करित सुंदर बनविला, आता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी सर्वागिंक विकास करण्यासाठी त्यांना ५ व्यांदा विजयी करावे असे आवाहन केले, आपली प्रचंड उपस्थिती हि त्यांच्या विजयाची साक्ष देत असे आशावादी व विश्वासजनक उदगार वने-पर्यावरण केंद्रीय मंत्री ना.भूपेंद्र यादव त्यांना प्रमुख अतिथी व बुलढाणा जिल्हा प्रभारी म्हणून उपस्थित जनतेला मनोगत व्यक्त केले
आज दिनांक-२८/१०/२०२४ रोजी डॉ.संजय कुटे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राठी जिनिंग मध्ये सभारंभ आयोजित केला होता त्या सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष भाजपा सचिन देशमुख होते तर व्यासपीठावर केंद्रीय राज्य मंत्री मा. प्रतापराव जाधव, देवेंद्रजी वर्मा मध्यप्रदेश भाजपा नेते व महायुतीचे जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते केंदीय मंत्री यांनी पुढे आपले मनोगत व्यक्त करतांना यादव म्हणाले की आमदार संजुभाऊ कुटे आज पर्यंत कोविड काळात लोकांची सेवा केली तसेच पिण्याचे पाणी शिक्षण नियोजित हॉस्पीटल आणि प्रक्रिया उद्योग इत्यादींचा लेखा जोखा सांगितला आता उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी विदमान आमदार संजयभाऊ कुटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा व राहिलेल्या योजना पूर्ण करण्याची संधी द्यावी असे शेवटी त्यांनी आव्हान केले महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. कुटे यांनी आपल्या मनोगतातून आज पर्यंत केलेल्या कामांचा लेखा जोखा सांगून भविष्य विषयी मत मांडताना त्यांची भावना प्रधान म्हणजे माझी निवडणूक मी लढवत नसून मंचकावरील मातृ शक्ती निवडणूक लढवणार आहे लाडकी बहिण योजनेसाठी अर्थ संकल्पात ४० हजार कोटी रुपयांची मार्च पर्यंत तरतूद केली आहे त्यामुळे ती योजना कोणीही बंद करू शकत नाही व होणार पण नाही महिलांना ५०% मोफत शिक्षण एसटी मध्ये सवलत सोनाळा येथे तरुणांच्या हाताला काम साठी संत्राउद्योग व या तीन वर्षात आपल्या मतदार संघात साखर कारखाना आणल्या शिवाय राहणार नाही असे वचन देतो हि माझी शेवटची लढाई आहे आपण मला चार वेळा आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली असेच आशीर्वाद या वेळीही द्यावे हि विनंती करतो असे म्हणून आपले भाषण संपविले त्या वेळी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी हि मला जसे आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद आमदार डॉ संजय भाऊनां द्यावे अशी विनंती केली सभेचे प्रास्ताविक रंगराव देशमुख त्या नंतर आभार भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख त्या नंतर रैलीने उपस्थित नागरिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गाने निघाली वाजत गाजत रैली निघाली त्यातही गर्दी प्रचंड होती तर महिलांची संख्या खूपच असल्याने रॅलीचे पहिले टोक दुर्गा चौक ते शेवटचा व्यक्ती माळीखेळ पर्यंत होता भुतो ना भविष्य अशी भव्य रॅली स्वरूप प्रचंड होते उपविभागीय कार्यालय आ डॉ संजय भाऊ कुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सदर केला यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता