विशेष बातमी

मलकापूर येथील स्टेट बॅंकेच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत परकीय चलन सुविधा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

बुलढाणा प्रतिनिधी :- जिल्ह्यातील निर्यातदारांना परकीय चलनाशी संबंधित व्यवहार करण्यासाठी मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत नव्याने परकीय चलन सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. अमरावती विभागातील सर्वाधिक निर्यात बुलढाणा जिल्ह्यातून होत असल्यामुळे ही शाखा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या शाखेच्या माध्यमातून निर्यातदारांना परकीय चलनाशी संबंधित व्यवहार थेट मलकापूरमध्येच करता येणार आहेत.आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील निर्यातदारांना त्यांच्या परकीय चलन व्यवहारांसाठी अकोला येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसे आणि अतिरिक्त परिश्रम वाया जात होते. मात्र, आता मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत नव्याने सुरु झालेल्या सुविधेतून हे सर्व व्यवहार सहज आणि सोप्या पद्धतीने करता येणार असल्यामुळे व्यापारी, निर्यातदार व उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या शाखेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निर्यातदारांना थेट जिल्ह्यातच परकीय चलनाशी संबंधित सेवा मिळाल्यामुळे आर्थिक व्यवहार वेगाने आणि सोयीस्कर पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. परकीय चलन बिलांची परतफेड (फॅारेक्स बील रिडेम्पशन) आता स्थानिक पातळीवरच करता येणार असल्याने निर्यातदारांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.“निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात अव्वल असलेल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक पाऊल आहे. परकीय चलनाशी संबंधित व्यवहार सुलभ सुविधा मलकापूर एसबीआय च्या लघू व मध्यम उद्योग शाखेत सुरू झाल्याने जिल्ह्यातील निर्यातदारांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे त्यांचा वेळ, मेहनत आणि आर्थिक खर्च वाचणार असून, त्यांचे व्यवहार अधिक गतीमान व सोयीस्कर होतील.”असे मत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले. व्यापारी, निर्यातदार व उद्योजकांकडून स्वागतजिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक आणि निर्यातदारांनी या सुविधेचे स्वागत केले असून, यामुळे जिल्ह्यातील व्यवसायवृद्धीला नवा वेग मिळणार आहे. मलकापूर येथे ही सुविधा उपलब्ध झाल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *