पातुर्डा येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] लोकनेते खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १६ डिसेंबर रोजी पातुर्डा येथे जि. हायस्कुल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी केल्याने आरोग्य शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला भव्य आरोग्य शिबिराचे अध्यक्ष रा कॉ चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील तर उदघाटक
माजी आमदार नानभाऊ कोकरे , मा.जि प सदस्य ज्योतीताई खेडेकर यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून केले तर व्यासपीठावर राष्ट्रवादी यु कॉ जि अध्यक्ष पराग अवचार, अल्पसंख्याक जि कार्याध्यक्ष रॉष्ट्रवादी एम .डी. साबीर, नारायण ढगे, ता अ संजय मारोडे , माजी नगराध्यक्ष तुकाराम घाटे , लीलाताई दामधर , शिवहरि खोंड रामदास धर्माळ, मिलिंद वानखडे, इंद्रभान वानखडे, अशोक खोंड , नंदू अढाव, बिस्मिल्ला खान, मुन्ना बोराखडे, श्याम देशमुख, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेसन्नजीत पाटील यांनी मार्गदर्शन करताना
या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्ती प्रकृती कडे दुर्लक्ष करीत असतो
आरोग्य तपासणी व निशुल्क उपचारा करिता आपल्या गावातील आणी परिसरातील लोकांना आरोग्याची सेवा मिळावी या सेवाभावी वृत्तीने संगीतराव भोंगळ आरोग्य शिबिर घेत असतात , आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांच्या तपासण्या होत असतात व ज्या रुग्णाना आरोग्याच्या काही समस्या आहेत आजार आहे अशा शेकडो रुग्णाच्या शस्त्रक्रिया सुद्धा होत असतात ही खूप मोठी सेवा असल्याचे मत व्यक्त केले तर जि प सदस्या ज्योतीताई खेडेकर यांनी दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणारे संगीतराव भोंगळ यांचे कार्य अतुलनीय असल्याचे मत व्यक्त केले.आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो रुग्णाची डोळे, ईसीजी, इको, नाक, कान, घसा, महिलांच्या आरोग्य तपासणी सह इतर सर्व तपासण्या व रक्त चाचण्या डॉ. रत्नशेकर जैन व सहकारी जळगाव खान्देश, डॉ. विलास चौधरी व त्यांचे सहकारी, डॉ योगेश नायसे,डॉ.तायडे, डॉ. वानखेडे यांचेकडून करण्यात आल्या आरोग्य शिबिरात सकाळ पासून नागरिकांची, वृद्ध, मुले व महिला यांची आरोग्य तपासणी साठी मोठी रांग होती हे विशेष
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हा दिनेश वानखडे, गजानन पुंडे, विष्णू पाटील, ज्ञानेश्वर बोपले, प्रघोष झाडोकार, रामदास ठाकरे, प्रशांत आढाव, पंजाब वानखडे, गिरीश देवगिरीकर, आकाश गोमासे , नंदू आढाव, मोहन सोनोने, बाळू म्हसाळ, हरिभाऊ पुंडे ,बिस्मिल्ला खान ,नागो पाटील, शेख दावल, फक्रोदिन मिस्त्री, दिनकर दातकर, संजय बापट, उत्तमराव हातेकर, इनायत खान, कुर्बान अली, दिनकर इंगळे, कैलास चंदनशिव, संतोष दाने, रवींद्र दाणे, अजय काळे सागर भाकरे आरोग्य शिबीर आयोजन प्रशंसनीय कार्य माजी आ.कोकरे
अशा शिबिरांमुळे सामान्य लोकांचा आर्थिक व शारीरिक, मानसिक त्रास कमी होतील आणि काही व्याधी असल्यास अल्पावधीतच लक्षात येईल अशा शिबिर आयोजित करणाऱ्या संगीतराव भोंगळ यांची करावी तेवढे कौतुक कमीच असल्याचे मत माजी आ.नाना कोकरे यांनी व्यक्त केले.व्याधी मुक्त रुग्णांचे चेहऱ्यावरील समाधान सेवा करण्याचे अधिक बळ देते-संगीतराव भोंगळ
शेतकरी ,कष्टकरी, सामान्य व्यक्तीं यांचे मध्ये आरोग्य तपासणी बाबत जागरुकता व्हावी, काही आजार असल्यास त्याचे निदान वेळेवर होऊन निशुल्क उपचार व्हावे या करिता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने आरोग्य शिबिर आयोजित केल्या जाते. रुग्ण व्याधीमुक्त झाल्यावर त्यांचे चेहऱ्यावरचे समाधान दरवर्षी आरोग्य शिबीर आयोजित करण्याचे बळ देते असे मत प्रास्ताविक पर बोलतांना आयोजक संगीतराव भोंगळ व्यक्त केले