महाराष्ट्रराजकीय
युवा सेना संग्रामपुर तालुका प्रमुख पदी डॉ प्रशांत इंगळे

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील निवाणा येथील रहिवासी डॉ प्रशांत इंगळे यांची युवा सेना संग्रामपुर तालुका प्रमुख पदी युवा सेना जिल्हा प्रमुख शुभंम दत्तात्र्य पाटील यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे
डॉ प्रशांत इंगळे सुरुवात पासुन शिवसेना पक्षा सोबत एक निष्ठ असुन महाराष्ट्रात अलीकडीलच्या काळात राजकिय वातावरण ढवळून निघाले असतांना माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धवराव ठाकरे सोबत राहिले व शेवट पर्यत राहणार असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले शिवसेना पक्षा प्रति असलेली एकनिष्ठा पक्षाच्या आदेशान्वये तन मन धनाने पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी निस्वार्थ केलेल्या कार्याची पावती म्हणुन युवा सेना तालुका प्रमुख पदी नियुकती झाल्याचे त्यांनी सांगितले शिवसेना पक्ष युवा सेना तालुका प्रमुख पदी डॉ प्रशांत इंगळे यांना संग्रामपुर शिवसेना पक्ष कार्यालयात एका नियुक्ती व्दारे युवा सेना जिल्हा प्रमुख शुभंम पाटील यांनी केली यावेळी युवा सेना जिल्हा उपप्रमुख अमोल मोदे लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख युवा सेना ईश्वर वाघ , संग्रामपुर शिवसेना प्रमुख रविन्द्र झाडोकार , तालुका उपप्रमुख कैलास कडाळे उपस्थित होते संग्रामपुर तालुका युवा सेना तालुका प्रमुख पदी डॉ प्रशांत इंगळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल एका छोटे खानी कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ गुलपुष्प देऊन सत्कार केला त्यांच्या वर युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्या कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे