महाराष्ट्र
बामसेफचे ४० वे संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ती मोर्चाच्या १३ व्या संयुक्त राष्ट्रीय अधिवेशना ला उपस्थित रहा सुजित बांगर जिल्हा कार्याध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा बुलढाणा

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बामसेफचे ४० वे संयक्तु राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ति मोर्चाचे13 वे संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन नागभमूी नागपूर येथे दि. २४ डीसेंबर ते 28 डीसेंबर असे सलग 5 दिवस होणार आहे. यामध्ये देश भरातील तज्ञ सुमारे 55 संवेदनशील विषयांवर आपले मत मांडणार आहेत. सर्व सत्राची अध्यक्षता मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, BAMCEF, नवी दिल्ली) करतील.या अधिवेशनात सुमारे32 राज्ये, 624 जिल्हे, 4800 तहसील, 2 लाख गावे आणि 4800 जातींचे प्रतिनिधी SC/ST/OBC/NT/नागवंशी आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच प्रदेशातील 37 देशाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. देश विदेशातील लाखो प्रतिनिधी एकाच संकुलात सलग ५ दिवस मुक्काम करतात.या अधिवेशनाचे वैशिष्ट म्हणजे महिलांचे स्वतंत्र एक दिवस अधिवेशन होणार आहे. ज्यामध्ये महीलांशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाईल. SC/ST/OBC/अल्पसंख्याकांच्या सध्याच्या समस्येच्या कारणाशी संबंधित विषयांवर चर्चा होईल. हे अधिवेशन केवळ ऐतिहासिक नाही तर देशाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारे ठरेल.मूलवासी बहुजन समाजाचे हक्क आणि अधिकार कोन हिसकावून घेत आहे आणि ते कसे वाचवता येईल,याचे विश्लेषन येथे केलेजाईल बामसेफचे हे अधिवेशन फुले शाहू, पेरीयार व आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारत
घडवण्याचा संकल्प करते. त्यामुळे सर्व नागवंशी बहुजनांनी या अधिवेशनात सहभागी होऊन या महान विचारांच्या
लढाईत सहभागी व्हावे. असे आवाहन सुजित बांगर जिल्हा कार्याध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा बुलढाणा यांनी केले आहे.