३६ कोटी रुपये किमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न

आज दिनांक- २४ डिसेंबर २०२३ रोजी *बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील खामगाव रोड ते पोद्दार शाळेपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे रुपये 68 लक्ष मौजे.सुंदरखेड येथे तारकॉलनीमध्ये बुद्धविहाराचे बांधकाम करणे 12 लक्ष रुपये सुंदरखेड माऊली पार्क येथे बुद्धविहाराचे बांधकाम करणे 12 लक्ष रुपये या सर्व कामांसह विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला*,सदर कार्यक्रमासाठी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई गणेश बाहेकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे, भाजपा तालुकाध्यक्ष मोहन पवार, युवासेना तालुकाप्रमुख श्रीकांत जाधव, शिवदुत तालुकाप्रमुख नितीन राजपूत, शिवसेना उपतालुका प्रमुख माणिकराव सावळे, अनिल जगताप, शिवसेना नेते प्रवीण जाधव, यांच्यासह शिवसेना,युवासेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तथा सर्व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.