संग्रामपूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष पदी प्रतिभा विजय इंगळे कार्याध्यक्ष पदी हर्षल खंडेलवाल अविरोध

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये दि २४ डिसेंबर रोजी तालुका स्तरीय सरपंच संघटनेची बैठक श्रीकृष्ण तराळे यांच्या अध्यक्षा खाली संपन्न झाली सदर बैठकीत सरपंच संघटना तालुकाध्यक्ष पदी वरवट बकालच्या प्रथम नागरिक प्रतिभा विजय इंगळे यांची अविरोध निवड झाली आहे तर कार्याध्यक्ष पदी सोनाळा सरपंच हर्षल संतोष कुमार खंडेलवाल यांची निवड झाली नवनिर्वाचीत सरपंच संघटना तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्ष या दोघाचा शाल श्रीफळ हार घालुन सत्कार करण्यात आला तर उर्वरित कार्यकारणी मध्ये सर्कल निहाय उपाध्यक्ष खिरोडा सरपंच रुक्मिणी नांदोकार बावनबीरचे गजानन मनसुटे
आकोली सरपंच निशा सोळंके , कळमखेड रामेश्वर खंडेराव , वडगाव वान चे पंकज मिसाळ या सर्वाची निवड अविरोध झाली यावेळी अभयसिंह मारोडे , राहुल उमाळे, गणेश टापरे , विजय इंगळे , आजी माजी सरपंच , सह सरपंच पती उपस्थिती होती