विशेष बातमी
प्रतिभा साहित्य संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी अमोल व्यवहारे

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील उकळी बु येथील रहिवासी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव सामाजीक शैक्षणीक क्षेत्रा सह प्रयोग शिल शेतकरी यशस्वी युवा उद्योजक वक्ते अमोल व्यवहारे यांची प्रतिभा साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य या साहित्य चळवळीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून तसे नियुक्त पञ देऊन त्यांचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ अभिनंदन करण्यात आल्याची माहिती प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष,कवी विठ्ठल कुलट यांनी दिली आहे.अमोल व्यवहारे यांचे सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य असून सात सामुहिक विवाह सोहळे,आरोग्य,रक्तदान शिबिरे,महिला बचत गट,आदिवासी मेळावे,युवा सांसद कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले आहे.त्यांचा शेती व्यवसायाला पुरक स्वनिर्मित मसाला उद्योग असून ते प्रगतशील शेतकरी आहेत सुशिक्षीत युवक-युवतींना याबाबत सातत्याने आपल्या व्याख्यानांमधून मार्गदर्शन व प्रेरणादायी कार्य करीत आहे. नियुक्ती पत्र देतांना प्रतिभा साहित्य संघाचे केन्द्रीय सचिव कवी विजय सोसे,अकोला जिल्हाध्यक्ष अरूण काकड,अमरावती जिल्हाध्यक्ष राजेन्द्र ठाकरे सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती अमोल व्यवहारे यांची प्रतिभा साहित्य संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे