शिक्षक शेख मतीन शेख नजीर यांच्या मार्गदर्शनात शेख मुशफिकला विज्ञानप्रदर्शनीत प्रथम पारितोषिक

बुलडाणाः देऊळघाट येथील शेख मुशफिक शेख कदीर या उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये बक्षिस पटकावले असून त्याच्या या यशाबद्दल शाळेच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद उर्दू उच्च शाळा देऊळघाटचा तो विद्यार्थी आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती बुलडाणा व नगर परिषद बुलडाणाच्या वतीने 30 डिसेंबर त्ो 31 डिसेंबर कालावधीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होत्ो. यामध्ये जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देऊळघाट पंचायत समिती बुलढाणा इयत्ता 7 वी चा विद्यार्थी शेख मुशफिक शेख कदीर आणि शिक्षक शेख मतीन शेख नजीर यांनी सक्रीय सहभाग घेतला. शेख मुशफिकला या विज्ञान प्रदर्शनीमध्ये उच्च प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक मिळाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अंजली कुळकर्णी, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमतीटाकळकर, शिक्षणविस्तार अधिकारी जयमाला राठोड, न.प. प्रशासन अधिकारी जाधव यांच्याहस्त्ो शिक्षक शेख मतीन व मुशफिक यांचा सत्कार करण्यात आला.
या विज्ञान प्रदर्शनीत बुलढाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ,नगरपालिका शाळा, खाजगी (अनुदानित विनाअनुदानित) शाळा व सर्व माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या.