आरोग्य

संग्रामपूर पं समिती मध्ये पाणी गुणवत्ता  विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न

संग्रामपूर [ प्रतिनिधी ]  ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध, सुरक्षित व शास्वत पाणीपुरवठा हर घर नल से जल या उद्देशाने  केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेले जल जीवन मिशन हे अभियान घर-घरपर्यन्त् यशस्वी राबवाच्या उद्देशाने गट विकास अधिकारी एस.व्ही.देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण आयोजित केले होते. उपस्थितांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रशेखर मारोडे यांनी मार्गदर्शन केले.जलजीवन मिशन जिल्हा परिषद बुलढाणाा अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दि १० जानेवारी  रोजी पंचायत समिती सांग्रामपूर येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणास तालुक्यातील विस्तार अधिकारी सोनोने , नगर पंचायत , ग्रामसेवक, आरोग्य सेवक आरोग्य सहाय्यक यांची उपस्थिती होती.
जल जीवन मिशन घटका अंतर्गत केंद्र व राज्य शासन धोरण व अंमलबजावणी  या करिता  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यात पाणी गुणत्ता विषयक एक दिवसीय प्रशिक्षण सुरु आहे.
केंद्र व राज्य शासनाचे पाणी गुणवत्ता विषयक धोरण व अंमलबजावणी या विषयाचे अनुषंगाने एक दिवसीय तलुकास्तरीय प्रशिक्षणाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. तालुकास्तरीय समूह समन्वयक सुभाष इंगळे  यांनी प्रास्ताविक केले.गट समन्वयक श्याम गायकी यांनी सदर प्रशिक्षणाबाबतची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक जलजीवन मिशन जिल्हा कक्षातील जन निरीक्षक शरद ठाकूर यांनी पाणी गुणवत्ता विषयक शासनाचे धोरण तसेच अंमलबजावणी, मार्गदर्शक सूचना, जलसुरक्षक यांची भूमिका, एफ.टी.के. किट, पाणी नमुनेचे अनुषंगाने  नमुनेंच्या अनुषंगाने प्रयोगशाळेशी समन्वय या बाबींवर विस्तृत असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. समूह समन्वयक प्रशांत काळे यांनी घरगुती नळ जोडणीसनियंत्रण व यांनी घरगुती नळ जोडणी तपासणी, स्रोतांची तपासणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची गाव निहाय रासायनिक व जैविक तपासणी, त्यासंबंधीच्या नोंदी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी अध्यक्ष स्थानावरून  तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रशेखर मारोडे यांनी सांगितले की प्रत्येक घरात शुद्ध स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे ही तुमच्या आमच्या सर्वांची नैतिकिक जबाबदारी आहे. शासनाचे महत्त्वकांक्षी असलेले जल जीवन मिशन हे गावा गावात यशस्वी करण्यासाठी गावागावात यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक आरोग्य सेवक आरोग्य सहाय्यक यांची भूमिका अतिशय मोलाची आहे यासाठी प्रत्येकाने आपले बरी योगदान दिल्यास निश्चितच जलजीवन मिशन हे तालुक्यात  राबविले जाईल. यावेळी  वैद्यकीय अधिकारी  अंजली उजवणे व मनीषा राऊत यांनीही उपस्थित त्यांनाअंजली उजवणे व मनीषा राऊत यांनीही उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक गावात पाण्याची गुणवत्ता जोपासने या साठी आपले योगदान देऊन जलजीवन मिशनचा मुख्य उद्देश साध्य करावा असे आवाहन जि. प. पाणीपुरवठा व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak