पातुर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थेस एमसीडीसी प्रकल्प अधिकारी चासकर सह विविध विभागाचे अधिकारी यांची भेट
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थेला एमसीडीसी स्मार्ट पुणे नाबार्ड, व विविध विभागाचे अधिकारी यांनी दि ११ जानेवारी रोजी भेट देऊन ग्रामसेवा सहकारी संस्थेचे संचालका सोबत चर्चा करुन संस्थेची आर्थीक परीस्थिती व दैनदिन कामकाजा विषयी माहीती संस्थेचे अध्यक्ष शरद तायडे व सचिव संजय पांडे यांनी दिली. संस्थे विषयी माहिती जाणुन घेत संस्थेच्या कामकाज बाबत एमसीडीसी प्रकल्प अधिकारी चासकर यांनी समाधान व्यक्त केला केंद्रशासन पुरस्कृत 151 व्यवसाय कशाप्रकारे करता येतात या विषयी विविध विभागाचे अधिकारी यांनी संस्थेच्या संचालकांना माहीती दिली.स्व.बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत संस्थेला नविन गोदाम कसे बांधता येईल या विषयी एमसीडीसी प्रकल्प अधिकारी चासकर यांनी मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळावा,त्यासाठी भाव मिळेल तेव्हा धान्य विक्री करता यावे व मालाला चांगली बाजारपेठ कशी मिळेल यासाठी संस्थेने माल तारण योजना सुरु करावी,याप्रकारे मार्गदर्शन केले.संस्थेची आर्थीक परीस्थिती व दैनदिन कामकाजाविषयी माहीती संस्थेचे अध्यक्ष शरद तायडे व सचिव संजय पांडे यांनी दिली.संस्थेची माहीती जाणुन घेऊन अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले.याप्रसंगी सहकार नेते तथा विदर्भ को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे माजी संचालक विश्वनाथ झाडोकार संस्थेचे अध्यक्ष शरद तायडे,उपाध्यक्ष प्रकाश देशमुख,संचालक रविन्द्र झाडोकार,सतिष चोपडे,शेख सुलतान,सुनिल तायडे,विजय चोपडे,अशोक दाभाडे सह संस्थेचे सचिव संजय पांडे व सभासद उपस्थित होते.