आरोग्य
कला वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे रक्तदान शिबिर संपन्न
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] कला वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना , शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये दिनांक 12 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित सांस्कृतिक सोहळ्याचे औचित्य साधून 16 जानेवारी 2024 रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी , विद्यार्थिनी प्राध्यापक तसेच शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले तर सामान्य रुग्णालय खामगाव येथील डॉ प्रणाली देशमुख व रक्त पेटी तंत्रज्ञ राजश्री पाटील यांच्या सहकारी आरोग्य कर्मचारी असिफ शेख अभिपारीचारक, नेहा राहाटे , वैष्णवी वानखडे अशोक पराते कक्षसेवक, यांनी रक्त संकलन केले ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथील योगेश नायसे व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले शिबिराच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर, आय क्यू एसी समन्वयक डॉ. संजय टाले, सांस्कृतिक समिती समन्वयक डॉ. राजेंद्र कोरडे, प्रा. सुरेश भालतडक सह खामगाव येथील आरोग्य चमूने संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. सुरेश भालतडक यांनी आजच्या कार्यक्रमाचे औचित्य सांगून रक्तदान काळाची गरज आहे असे मत मांडले. आभार प्रदर्शन प्रा. सोनाली तायडे यांनी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यास आव्हान केले. यशस्वीते साठी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.