राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जे.जे. अभ्यासिकात कायदेविषयक मार्गदर्शन

वाशिम :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिमच्या संयुक्त वतीने आज २५ जानेवारी रोजी झाकलवाडी रोड, लाखाळा येथील जे.जे. अभ्यासिका येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके होते. श्री.शेळके यांनी पोक्सो कायदयाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड.शुभांगी खडसे यांनी महिलांचे कायदे या विषयावर, ॲड.राहुल पुरोहित यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने तर सुनिल कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी, लोक अभिरक्षकख् विधी स्वयंसेवक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनिता जगताप यांनी केले. उपस्थितांचे आभार संजय जगताप यांनी मानले.