रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट रॅली

बुलडाणा, दि. 25 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त शहरातून हेल्मेट रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हेल्मेट रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
हेल्मेट रॅली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बॅंक चौक, तहसिल चौक, त्रिशरण चौक, सर्कुलर रोड मार्गे धाड नाका, जयस्तंभ चौक मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी शिपाई संवर्गातील कर्मचारी व सफाई कामगारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकाचे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या अध्यक्षेत स्कुल बस समितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्याधिकारी गणेश पांडे, शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, उपस्थित होते. उपस्थितांनी रस्ता सुरक्षा संबंधी मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले.