लहाने ले आऊट ग्राउंड मध्ये कथा मंडपाचे भूमिपूजन संपन्न
दिव्यसुंदरकांड व भागवत कथा श्रवण करावी - राधेश्याम चांडक

बुलडाणा:- सद्भावना सेवा समिती द्वारा दि.६ फेब्रुवारीला प.पू.संत सुश्री अलकाश्रीजी यांची भव्य शोभायात्रा व दिव्य सुंदरकांड आणि दि.७ फेब्रुवारी पासून सुश्री देवी प्रियंकाजी यांची श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असुन या सर्व आध्यात्मिक सत्संगाचा लाभ घ्यावा,व कथा श्रवण करुन परमानंद प्राप्त करावा असे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी कथा मंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.लहाने ले आऊट, बुलडाणा येथे कथा मंडप भूमिपूजन प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार धिरज लिंगाडे यांनी विधीवत पंडित गणेश पाठक यांच्या कडून पूजा
करुन घेतली.मान्यवरांनी कुदळ मारुन श्री गणेशा केला.इतर सर्वांनी हातभार लावला सुंदरकांड व भागवत कथेला सर्वांनी सहकार्य करुन लाभ घ्यावा असे आवाहन आ.लिंगाडे
यांनी करुन कथेला शुभेच्छा दिल्या.आ.संजय गायकवाड यांनी
कथेला तन, मन, धनाने सहकार्य करावे असे आवाहन चा संदेश पाठवून केले.
रामलला प्राण प्रतिष्ठा आणि सद्भावना सेवा समितीचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या भूमिपूजन प्रसंगी
चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सिध्दार्थ शर्मा,प्रकाशचंद पाठक,
सुरेश गट्टाणी, सुभाष दर्डा, विजय सावजी, विजय शर्मा, पंजाबराव ईलग,प्रकाश वाठकर,सौ.पूर्णिमा महाजन, डॉ पवन बजाज, गिरधारी शर्मा,नरेश मुंदडा, गोपाल चिराणिया,लाला माधवाणी, मनमोहन शर्मा, बाळासाहेब गिव्हे, चंद्रशेखर माळी, मदनलाल शर्मा, राजेश नारखेडे, विजय जोशी,राजु टेकाडे, शेवाळे मामा, गजानन वैद्य, अनंताभाऊ देशपांडे, चंद्रशेखर सदावर्ते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राधेश्याम चांडक, आणि आ.धिरज लिंगाडे यांनी प्रकट मुलाखती देवून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.भूमिपूजनाचे पौरोहित्य पंडित गणेश पाठक आणि गणेश जोशी यांनी केले.