विशेष बातमी

बुलडाणा गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड

निलंबन आदेशाची प्रत देत नसल्याचा आरोप

बुलडाणा :- तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी बुलडाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली असता त्यात आरोपात तथ्य आढळल्याने देऊळघाट ग्रामविकास अधिकाऱ्याला एका आदेशान्वये निलंबित केल्याचे समजते परंतु सदर निलंबन आदेशाची परत तक्रारकर्त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे उपसरपंच आरिफ खान, माजी पं. स. उपसभापती मुश्ताक अहेमद, माजी सरपंच गजनफरउल्लाह खान, विकास देशमुख, सखाराम पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान, अनिस खान, शेख आरिफ यांच्यासह इतरांनी 31 जानेवारी 2024 ला सायंकाळी 5 वाजता बुलडाणा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. निलंबन आदेशाची परत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव यांना निलंबित केल्याचा लेखी पत्र अखेर आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *