बहुजन मुक्ती पार्टीचे युवा प्रदेश महासचिव पदी सुजित बांगर यांची निवड !

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] दरवर्षी प्रमाणे यावर्षी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीची नवीन कार्य निष्पादन समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये पक्ष संघटनेने सुजित बांगर यांची प्रदेश महासचिव पदी निवड करण्यात आली आहे.ही बुलढाणा जिल्ह्यासाठी व संपुर्ण महाराष्ट्रात गौरवाची बाब ठरली आहे.
सुजित बांगर हे अनेक सामाजिक, राजकिय व धार्मिक कार्यात अग्रेसर राहीले आहेत. त्यांनी NRC, CAA, 13 पॉईन्ट रोष्टर विरोधात अनेक आंदोलने केली. किसान आंदोलन, भोन स्तूप बचाव आंदोलन, मराठा समाजाला लोकसंख्खेच्या प्रमाणात आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा सदैव पुढाकार राहीलेला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ६२ हजार शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात त्यांनी रस्त्यावर ऊतरून आंदोलने केलीत. बहुजन समाजाला महापुरूषांचा इतिहास त्यांचे कार्य व त्यांच्या त्यागाप्रती ईमानदार राहून आपन कार्य केले पाहिजेत असे त्यांच्या सोशल मिडिया वरून वारंवार दिसून येते. लॉकडाऊन मध्ये बुलढाणा जिल्ह्यात लसीकरणाच्या विरोधात त्यांची भूमिका राहिली आहे. कारण त्यावेळेस त्यांचे आरोग्य विभागाला तसेच तहसिल कार्यालयाला , जिल्हाअधिकारी यांना निवेदने दिली होती की लस स्वच्छिक आहे का ऐच्छिक आहे?त्या लसीमध्ये कोनते कंन्टेन आहेत,जर लस घेतल्यामुळे संबंधीत व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसास पाच करोड रूपये शासनाने द्यावे. असे ते समाजाप्रती प्रामाणिक असेलेले युवा व्यक्तीमत्व म्हणजे सुजित बांगर म्हणूनच त्यावेळी सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक झाले आदिवासी बहुल बुलढाणा जिल्ह्यातील उभरत युवा नेतृत्व म्हणून सुजित बांगर यांच्याकडे पाहिल्या जात आहे. समाजाला अशा निर्भीड युवा नेतृत्वाची गरज आहे. पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय अती उत्तम असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विनोद पवार यांनी सांगितले आहे. यावेळी सुजित बांगर यांनी म्हटले आहे की पक्ष संघटनेने माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठी व समाजाला योग्य दिशा दाखवुन न्याय मिळवून देण्यासाठी मी नियमीत प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे.