विशेष बातमी
प्राध्यापक सुरेश भालतडक यांना पीचडी पदवी प्राप्त

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे वाणिज्य विभागामध्ये कार्यरत प्रा. सुरेश भालतडक यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेची पीचडी पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे. त्यांचा संशोधन विषय ” पश्चिम विदर्भातील नवतरुण वर्गाच्या उपभोग प्रवृत्ती, बचत व गुंतवणूक विषयक सवयी ” एक अध्ययन कालखंड 2010 -11 ते 2019-20 हा होता. प्रा. भालतडक यांनी अगोदरच नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून आता पीचडी पदवी प्राप्त केल्यामुळे सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे उपाध्यक्ष हरिभाऊ इंगळे , डॉ संदिप वाकेकर ,डॉ स्वातीताई वाकेकर कला वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ श्रीराम येरणकर, यांनी कौतुक केले प्रा भालतडक यांना पीएचडी प्राप्त झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे