संग्रामपुरात विविध मांगण्या साठी समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी शेंडे यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या नेतृत्वात तामगाव पोस्टे पासुन तहसिल कार्यालयावर विविध मांगण्याचे बॅनर घेऊन भारतीय संविधान विजय असो , ईव्हीएम हटाव देश बचाव, शेंडे सर आगे बडो हम तुम्हारे साथ है , घोषणा देत मोर्चा तहसिल कार्यालय वर धडकला विविध मांगण्या त्यात राहती जागा अतिक्रमण धारकांच्या नावे करा शेत माल कपासीला १० हजार रुपये , सोयाबीनला ७ हजार रुपये भाव द्या , बेरोजगाराना नोकरी द्या , घरकुलाचे उदिष्ट वाढवुन द्या , शासकिय अतिक्रमण जागेवर घरकुल द्या , शाळा बंदचे परिपत्रक रद्द करा , गायरान ई क्लास , पडीत जमीन वरिल अतिक्रमण नियमीत करा , २०२२ परिपत्रक २०१८ ची अमलबजावणी करा , अल्पसंख्यांक साठी घरकुल निधी मोठ्या प्रमाणात तरदुर करा , बेकायदेशीर अतिक्रमण हटविणाऱ्या संबंधीतांवर कारवाई करा अश्या विविध मांगण्यावर समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी शेंडे सर यांनी उपस्थित मोर्चेकरांना मार्गदर्शन केले तर प्रा दयावान गव्हाणे , प्रा अशोक वानखडे, प्रा प्रमोद मेश्राम, डॉ गोपाल उपाध्य, यांची समायोचीत भाषणे झालीत यावेळी तालुकाध्यक्ष केशवराव वानखडे, अण्णा सुरजुसे, गणेश परघरमोर , बाळू वानखडे, भाऊराव वानखडे, रमेश वानखडे, गजानन वानखडे, संजय इंगळे , निळकंठ खंडेराव , श्रीराम खंडेराव सह बहुसंख्य समाज क्रांती आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते