कृषी विभाग योजना जागृतीपर कार्यक्रम संपन्न
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जा व्दारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे महाराष्ट्र शासनाच्या संग्रामपुर तालुका कृषी विभाग व महाविद्यालयातील रोजगार, संगीत कला व सांस्कृतीक कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभाग योजना जागृती कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 16 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. स्थानिक लोक कलाकृतीच्या माध्यमातुन कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात कृषी अधिकारी अमोल बनसोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांचे कृषी व कृषी संबंधी विषयावर मार्गदर्शन लाभले, त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने आमंत्रीत केलेल्या चमुने अनेक प्रबोधनात्मक तालबद्ध केलेली गीत सादर करुन शासनाच्या विविध योजनांचा प्रचार केला.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर, तालुका कृषी विभाग, संग्रामपुर येथील कृषी अधिकारी अमोल बनसोडे महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुभाष गुर्जर, प्रा.डॉ. राजेंद्र कोरडे, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ. संजय टाले, अधिक्षक अजय चोपडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक .प्रमोद पिंजरकर . संतोष अस्वार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.निशीगंध सातव यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी प्रा.डॉ. सतीष राणे, प्रा. नित्यानंद डहाके, प्रा. निलेश शेळके, प्रा.डॉ. मेघा सोळंके, प्रा. सोनाली तायडे, प्रा.नागेश इंगळे, प्रा. सिद्धार्थ इंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रबोधनपर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.