क्राईम
अल्पवयीन मुलीला तु मला सोडून गेलीस तर आत्महत्या करेन धमकी व दबाव टाकुन फूस लावून पळविले सोनाळा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासी गावातील घटना
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील एका आदिवासी गावातील अल्पवयीन मुलीला एका ३४ वर्षीय युवकाने सदर मुलीला तु मला सोडून गेलीस तर मी आत्महत्या करिन असा धाक व दबाव टाकत फुस लावुन पळवुन नेल्याची घटना सोनाळा पोस्टे हद्दितील आदिवासी गावात घडली या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि दि. १५ रोजीच्या रात्री ९ वाजता दरम्यान अल्पवयीन मुलीचे कुटुंब जेवण झाल्यानंतर झोपी गेले मुलीचे वडिल दि १६ फेब्रुवारी पहाटे ४ वाजता लघुशंकेसाठी उठले मुलगी दिसली नाही गावात व परिसरात नातेवाईका कडे चौकशी केली असता गावातीलच ३८ वर्षीय युवकाने अल्पवयीन मूलीवर दबाव टाकत फूस लावून पळवून नेले असल्याचे वडिलांना समजताच वडिलांनी सोनाळा पोस्टे गाठून मुलीला पळवुन नेणाऱ्याच्या नावानिशी रविवारी दुपारी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात आरोपी अनारसिंग सोळंके विरुद्ध कलम ३६३ भादवि नूसार गून्हा दाखल केला आहे सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सोनाळा पोलिसा कडून सुरु आहे