पातुडर्यात आज महासिद्ध महाराज यात्रा महोत्सव निमित्त भव्य कवी संम्मेलन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरित श्री महासिध्द महाराज यात्रा महोत्सव निमित्त साला बाद प्रमाणे यावर्षीही आठवडी बाजाराच्या प्रांगणात आज दि २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भव्य कवि संम्मेलनालाचे आयोजन श्री महासिद्ध महाराज आयोजक समिती व पातुर्डा ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले असुन महाराष्ट्रातील प्रसिध्द कवि झी मराठी हास्य सम्राट परतवाडाचे कवि श्री गौतम गुळघे , यवतमाळचे सुप्रसिद्ध हास्य कवि जयंत चावरे, एबीपी दुरदर्शन शेगावचे नितिन वरणकार, मगळूरपीरचे हास्य गेय कवि संजय कावरे ,दुरदर्शन स्टॉर कवीयत्री अलकाताई तालनकर, गजलकार निवेदक अकोलाचे गोपाल मापारी , मातृतिर्थ बुलडाणाच्या सुप्रसिध्द कवियत्री वैशालीताई तायडे उपरोक्त कवि , कवियत्री हे संपुर्ण महाराष्ट्र मध्ये गाजलेले निमंत्रीत कविचे भव्य कवि संम्मेलनचे आयोजन करण्यात आले असुन परिसरातील कवि प्रेमी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान श्री महासिध्द महाराज महोत्सव समिती व पातुर्डा ग्रामस्थाच्या वतीने प्रसिध्द पत्रकाव्दारे करण्यात आले आहे