टुनकीत ६ देशी पिस्टलसह काडतुस जप्त मध्यप्रदेशला लागुन बुलडाणा जिल्हयाती सीमावर्ती भागात सोनाळा पोलीसांची कार्यवाही आरोपी हरियाणा राज्यातील
संग्रामपुर [प्रतिनिधी ] लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा देशी पिस्टल सह मॅगझीन,काडतुस जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेश ला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती। भागात सोनाळा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.
सोनाळा पोलीस हद्दीतील टुनकी बु ते लाडणापूर मार्गावरील केदार नदी नजीक एका युवकास पोलिसांच्या पथकाने ६ देशी पिस्टल, ७ मॅगझीन, १ जिवंत काडतुस सह पकडले. २२ वर्षीय आरोपी वसीम खान इलियास खान हा सिंगार पुन्हाना गाव नुहू जिल्हा हरयाणा राज्यातील आहे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले पिस्टलची किंमत १ लाख ८० असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, कर्मचारी विनोद शिंमरे, राहुल पवार, शेख इम्रान यांनी ही कारवाई केली