जावेद सलीम खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

उपक्रमशील शिक्षक श्री.जावेद खान सलीम खान (जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा, सवणा, पं.स चिखली, जिल्हा बुलढाणा) यांना शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 रोजी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रमजी काळे साहेब यांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात ऍडव्होकेट खिजर पटेल (राज्य प्रवक्ता एम.आय.एम) ,नगर सेवक सह इतर मान्यवर प्रमूख पाहुणे उपस्थित होते. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा व पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.स) यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात येत आहे. या सोहळ्यात राज्यस्तरीय निबंध स्पर्धा मध्ये विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षी दशक पूर्ती सोहळ्यात शिक्षक श्री.जावेद सलीम खान यांनी नवनवीन उपक्रम करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्री.जावेद सलीम खान हे सामाजिक सेवा क्षेत्रात ही सक्रीय सहभागी असतात.तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्यांचे निवारण साठी नेहमीच
प्रयत्नशील असतात.सद्या ते राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी यांना सरसकट जूनी पेंशन लागू व्हावी यासाठी एकच मिशन….जूनी पेंशन या चढवडीत सक्रीय सहभागी आहे.
हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर ,त्यांचे सर्व राज्य पदाधिकारी व सदस्यांनी या दशकपूर्ती सोहळ्यातला यशस्वी पणे पार पाडण्यासाठी उत्कृष्ठ नियोजन केले होते.सदर सोहळ्यात श्री.जावेद खान यांच्या सोबत त्यांचे मित्र हनीफ खान सर, अकील खान सर, सय्यद खालिद सर आणि शकील अहमद सर उपस्थित होते. यांच्यासह राज्यभरातील अनेक शिक्षक सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आनंदी प्रसंगी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व राज्यातील शिक्षक संघटनाचे मान्यवरांतर्फे , शाळा,परिवार आणि सर्व मित्रांतर्फे
श्री.जावेद खान यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली.