एकलारा व बावनबीर महसुल मंडळात वादळी वाऱ्या सह गारपीट पावसाने नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शासकीय मदत व पिक विम्याची रककम द्या शेतकऱ्यांचे तालुका कृषि अधिकारी यांना निवेदन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्या गारपीट सह पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने एकलारा बानोदा, उमरा सह बावनबीर महसुल मंडळातील गहू, हरबरा, मक्का, ज्वारी,टरबुज, टमाटे, खरबुज, संत्रा रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने सर्वे पंचनामे करून शासकिय मदत द्या तसेच पिक विमा रक्कम द्या अशी मांगणी एका निवेदनाव्दारे तालुका कृषि अधिकारी अमोल बनसोड यांच्याकडे एकलारा बानोदा उमरा सह बावनबीर मंडळातील शेतकऱ्यांनी केली आहे
कृषि अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि निर्सगाने दगा दिल्याने यावर्षी खरीप हंगामी पिक उत्पादनात घट झाली बहुताश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघाला नाही त्यात भाव नसल्याने गरजे प्रमाणे पडेल भावाने शेत माल विकावा लागला तर भावा अभावी काही शेतकऱ्यांच्या घरात शेत माल पडून आहे कसे बसे रब्बी पिकांची आशा असतांना वादळी वाऱ्या सह गारपीट अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने नुकसान ग्रस्त रब्बी पिकाचे पंचनामे करा व पिक विका द्या अशी मांगणी शेतकरी सुनि अस्वार , गजानन धर्मे , हरि गाडगे , गोपाल धुर्डे , सुरेश धुर्डे, राजेश राऊत , नितिन देशमुख , भिमराव रेखाते आदि शेतकऱ्यांनी केली आहे