पोलिसाला अमानुष मारहाण करणे अंगलट व्हिडीओ व्हायरल पातुर्डा बीट जमादार नंदकिशोर तिवारी निलंबीत
बुलडाणा [ प्रतिनिधी ] सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या श्लोग्ना विरुद्ध एका पोलिस हेड कॉन्टेबलने कृर्ती केल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमात गैरअर्जदारानेच व्हायरल केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात घडली. यामुळे तामगाव पोलिसांच्या फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याचा अजब कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तामगाव पोस्टे हद्दीतील पातुर्डा येथील शेख मतीन शेख मोबीन आटो चालक हा फिर्याद देण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्यात आला होता. दरम्यान त्याच्या विरुद्धच हेकॉ नंदकिशोर तिवारी यांनी १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली. व गैरअर्जदारास खुश
करण्यासाठी थर्ड डिग्री वापरुन अमानुष मारहाण केली. फिर्याद यास गैर अर्जदाराच्या सांगण्यावरून त्याच्या सक्षम सदर बीट जमादार किशोर तिवारी या पोलिसांने मारहाण करतांनाचा व्हिडीओ गैर अर्जदार आरोपीने बनवला. व व्हायरल केला. तामगाव पोलिसांचा हा अजब कारभार समोर आल्याने जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मारहाण झालेल्या फिर्यादीचे नाव शेख मतीन शेख मोबीन आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी त्वरीत आदेश देवून नंदकिशोर तिवारी ह्या हेड
कॉन्टेबलचे निलंबन केले आहे. इतकेच नव्हे तर शेख मतीन शेख मोबीन यांच्या फिर्यादवरुन हेकॉ नंदकिशोर तिवारी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी गवळी यांनी भेट देऊन सदर प्रकरणाचा आढावा घेतला