फार्मथान (धावणेचे ) स्पर्धेत संग्रामपुर तालुक्यातील मयुरी लिप्ते जगातुन तृतीय तर भारतातुन प्रथम !
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] इंडियन फार्मास्युटिकल अशोशियनच्या वतीने पुणे येथील बालेवाडी शिव छत्रपती क्रीडा संकुलात फार्मथान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात संग्रामपुर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेली मयुरी संजय लिप्ते हिने २१ किलोमिटर धावनेचे स्पर्धेत जगातुन तृतिय तर भारतातुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला
फार्मथान स्पर्धेत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे ३० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला त्या मधे २१ किलो मिटर, १० किलो मिटर, ५ किलोमिटर धावणेचे स्पर्धे मधे संग्रामपुर तालुक्यातील भिलखेड लहाश्या खेडेगावातील मयुरी संजय लिप्ते हि राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ फार्मसी पुणेची विद्यार्थिनी असुन मयुरी संजय लिप्ते हिने २१किलोमीटर गटात भाग घेऊन भारतातुन प्रथम आली तर जगातुन तृतीय आली विविध राष्ट्रातील सहभागी विद्यार्थीनी पैकी इंग्लडची विद्यार्थीनी प्रथम तर ऑस्ट्रेलियाची विद्यार्थीनी व्दितीय तर तृतीय क्रमांकवर मयुरी लिप्ते राहिली व भारतातून प्रथम आली आहे या प्रसंगी तिला चषक , प्रशस्ती पत्रक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले या कामगिरी बद्दल पुणे येथे विविध विद्यालयात मयुरी लिप्ते हिचा सत्कार करुन सन्मानीत करण्यात आले विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे मयुरीने संग्रामपुर तालुका भिलखेड गावासह मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे मयुरी आपल्या यशाचे श्रेय जिद्द चिकाटीने धावणेचा केलेला सराव व प्रोत्सान देणारे लिप्ते हि राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ फार्मसी पुणेचे शिक्षक वर्ग व लिप्ते कुटुंबाना दिले आहे