विशेष बातमी
वरवट खंडेराव येथे श्री भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य आरोग्य शिबीर व महाप्रसादाचे आयोजन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील शिव स्वरुपेश्वर संस्थान वरवट खंडेराव येथे श्री भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे दि ४ एप्रिल गुरुवार रोजी आयोजन श्री भालचंद्र महाराज भक्तां कडून
आले असुन पुण्यतिथी कार्यक्रमा निमित्त परिसरातील भक्तांन साठी गोदावरी फाउंडेशन जळगाव(खा.) यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी ११ ते २ वाजे दरम्यान केले आहे पंचकोशितील गरजु रुग्णांनी उपस्थित राहुन शिबीराचा लाभ घ्यावा तर शिव स्वरूपेश्वर संस्थांन कडून महाप्रसाचे आयोजन करण्यात आले असुन पंचकुशीतील समस्त भाविक भक्तांनी या आरोग्य शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान शिव स्वरूपेश्वर संस्थान व वरवट खंडेराव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे
