विशेष बातमी
सातपुडा इंग्लिश मीडियम स्कूल वरवट बकालचा विद्यार्थी रुद्र ढंबाळे याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट खंडेराव येथील रहिवासी शेतकरी दिनेश ढंबाळे यांचा मुलगा वरवट बकाल येथील सातपुडा इंग्लिश मिडियम स्कुल येथे ५ व्या वर्गात शिकत असलेला रुद्र दिनेश ढंबाळे यांची जवाहर नवोदय विद्यालय चिंचोली शेगाव येथे निवड झाली निमकर्डे कोचिग कलासेसचे संचालक सेवानिवृत मुख्यध्यापक राम निमकर्डे यांच्या तालीमात तयार झालेल्या रुद्र यांची जवाहर नवोदय विद्यालय निवड साठी मुख्यध्यापक राम निमकर्डे यांचा सिहांचा वाटा असुन पातुर्डा येथील निमकर्डे कोचिंग क्लासेसचे संचालक मार्गदर्शक शिक्षक राम निमकर्डे यांच्या मार्गदर्शनात पातुर्डा परिसरातील ५० विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालय चिंचोली शेगाव साठी निवड झाली हे मात्र विशेष रुद्र आपल्या निवडीचे श्रेय त्याचे पातुर्डा बु येथील शिक्षक राम निमकर्डे व आई-वडील व अंगणवाडी सेविका आत्या उज्वला ढंबाळे यांना देतो जवाहर नवोदय विद्यालय शेगाव साठी निवड झाल्या बद्दल सातपुडा ईग्लिश मिडीयम स्कुल वरवट बकालचे प्राचार्य नायक , वर्ग शिक्षक , सातपुडा ईग्लिश मिडीयम स्कुल व्यवस्थापक विभाग प्रमुख पंकज तायडे यांच्या सह शिक्षक वृंद यांनी रुद्र ढंबाळे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला रुद्र याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे