
बुलडाणा, दि. 4 : लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तिनही निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून पी. जे. भागदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांक 9978407950 असून सर्कीट हाऊसमधील जिजाऊ कक्षामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. निवडणूक कायदा व सुव्यवस्थेसाठी निरीक्षक म्हणून सेंथिल कृषन्न यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9411112792, 9639146066 असून सर्कीट हाऊस मधील अजिंठा कक्षात त्यांचे वास्तव्य आहे. निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अमित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8811007872 असा आहे. त्यांचे वास्तव हे सर्कीट हाऊसमधील सावित्री कक्षात आहे.
निवडणूक विषयक तक्रारी किंवा समस्यांबाबत तिनही निरीक्षकांकडे म्हणणे मांडता येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या निवडणूक विषयक तक्रारी किंवा सूचना असल्यास निरीक्षकांकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.