विशेष बातमी

अवैध रेतीची वाहतुक करतांना ट्रक्टर पकडला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या पथकांची कारवाई

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात पुर्णा वान नदिपात्रातुन रेतीचे उत्खलन करुन महसुल विभागावरच रेती माफीया करवी पाळत ठेऊन लोकेशन घेत अवैध रेती वाहतुक सर्रास सुरु आहे महसुल विभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या विशेष पथकाने दि १० एप्रिल रोजी सकाळी पावने अकरा वाजता कवठळ येथील एका खाजगी विद्यालय जवळ अवैध रेतीच्या वाहतुक करतांना किसन शामराव अढाव रा पेसोडा यांच्या मालकीचे ट्रक्टर क्र एम एच २५ ए एल ९४८१ त्या मध्ये १ ब्रॉस अवैध रेती वाहतुक करतांना उपविभागीय अधिकारी काळे, यांनी स्वता पकडले व पुढील कारवाई साठी तहसिलदार योगेश्वर टोंपे, भारत किटे , जळगाव जा नायब तहसिलदार संजय मार्कंड, तलाठी पी एस नलावडे, जी आर पाटील , कोतवाल देशमुख , बिल्लेवार यांच्या ताब्यात ट्रक्टर देऊन त्यांच्या आदेशान्वये ट्रक्टर तामगाव पोस्टेला जमा करण्यात आले अवैध रेती वाहतुक करतांना अचानक तेही सकाळी पावने अकरा वाजता उपविभागीय अधिकारी शैलेश काळे महसुलच्या विशेष पथकाने अवैध रेती वाहतुक करतांना ट्रक्टर पकडल्याने अवैध रेती व्यसाय करणाऱ्याचे धाबे दणादले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *