धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनातधारणी पोलिसांची वॉरंट मोहीम यशस्वी तारखेवर गैरहजर राहणाऱ्या १९ आरोपी जाळ्यात
बुलढाणा [प्रतिनिधी ] धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्हयामुळे आरोपी असलेले मात्र तारखेवर सतत गैरहजर असल्याने अचलपुर कोर्टाकडून संबंधीत आरोपीचे वॉरंट काढण्यात आले होते पोलीस स्टेशन धारणी येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी यांची धारणी व अचलपूर न्यायालय येथे केसेस सुरू असून काही आरोपी तारखेवर सतत गैरहजर राहत असल्याने त्यांचे वॉरंट काढण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशावरून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी चार पथक तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले त्यानुसार पथक क्रमांक एक मध्ये एपीआय प्रियंका पाटकर सोबत पोलीस अंमलदार नितीन बोरसिया , गणेश घुले, मोहित आकाशे,जगत तेलगोटे,शेख गणी,अनुराग कथिलकर,सुमित घोटेकर यांच्या पथकाने ११आरोपींना ताब्यात घेतले तसेच पथक क्रमांक दोन मध्ये असलेले शंकर कासदेकर सोबत माधवराव जांबु,महेश सोळंके,सम्राट चव्हाण यांनी सहा आरोपींना पकडले तसेच पथक क्रमांक तीन मध्ये पीएसआय सतीश झाल्टे , वसंत चव्हाण,सुहास डहाके यांनी एक आरोपीस ताब्यात घेतले तर कळमखार बीट मधून पीएसआय विशाल राठोड , शंकर तायडे , रमेश चव्हाण यांनी एका आरोपीस पकडले अशाप्रकारे काही तासातच धरणी पोलिसांनी एकूण १९ आरोपींना अटक केली त्यांना आज कोर्टासमोर हजर केले जाईल अशी माहिती धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांनी दिली