विशेष बातमी

पेसोडा मडायखेड शेत गाड रसत्यावर अवैध रेती वाहतुक करतांना टिप्पर पकडले प्र तहसिलदार चव्हाण यांच्या पथकाची कारवाई

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील कोलद येथे कोतवाल अवैध रेती वाहतुक कारवाईच्या धाकाने एकलारा बानोदा येथील रहिवासी कोतवाल याचा बळी गेला सदर घटनेमुळे महसुल विभाग एक्शन मोडवर आल्या पासुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणानले परंतु तालुक्यात काहि ठिकाणी छुप्या मार्गाने महसुल विभागा च्या रेती कारवाई पथकावर खाजगी खबऱ्या मार्फत अवैध रेती व्यवसाईक नजर ठेवुन अवैध रेती वाहतुक करतांना आज सकाळी 09:30 वाजता कवठळ भाग 1 शिवारातील पेसोडाहून मडाखेडकडे येणार्‍या गाड रस्त्याने रेती वाहतूक करणातां प्रभारी तहसिलदार व्हि एस चव्हाण यांच्या पथकाने टीप्पर पकडले पेसोडा मडायखेड जाणाऱ्या गाड रसत्याने अवैध रेतीने भरलेले टिप्पर थांबवुन वाहण चालक दिपक संतोष कळींगे यांना रेती परवाना बाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचा परवाना आढळून आला नाही. तसेच वाहण चालकाला वाहण मालकाबाबत विचारणा केली असता सदर वाहण हे महेश माधव सुर्यवंशी रा.जळगाव जा. यांच्या मालकीचे असल्याचे चालक यांनी सांगितले. वाहण चालक यांच्याकडून टिप्पर क्रमांक MH28 BB 4098 अवैधरित्या 1 ब्रास रेती वाहतूक करताना जप्त करण्यात आले. सदर वाहनाचा पंचनामा करून वाहण हे पोलीस स्टेशन तामगाव येथे जमा करण्यात आले.
सदर कारवाई ही प्रभारी तहसिलदार व्ही एस चव्हाण संग्रामपूर, कवठळ मंडळ अधिकारी जी आर राऊत मंडळ , पी एस नलावडे तलाठी कवठळ भाग 2, जी आर पाटील तलाठी खिरोडा, मेजर आर. टी. बोदडे यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *