विशेष बातमी
वारी हनुमान येथे सुंदरकांडचे आयोजन भक्तांनी उपस्थित रहावे वारी हनुमान मित्र मंडळ सुरत यांचे आव्हान

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तिन जिल्ह्याच्या सिमेवर निर्सग रम्य वातावरण सातपुड्याच्या कुशित वसलेले तिर्थ क्षेत्र वारि हनुमान संस्थांन मंदिर प्रांगणात साला बाद प्रमाणे यावर्षीही श्री वारी हनुमान मित्र मंडळ सुरतच्या वतीने सुंदरकांड महापाठ, अखंड ज्योत व छप्पन भोग व महाप्रसादाचे आयोजन दिनांक १८ मे रोजी केले आले आहे. १८ मे रोजी सकाळी ९ पासून सुंदरकांड महापाठ सुरू होईल व दुपारी १२ पासून महाप्रसाद ला सुरवात होईल. सदर सुंदरकांड महापाठ ची प्रस्तुती दीपक मालानी यांच्याकडून होणार आहे. या आयोजनाचे विशेष आकर्षण म्हणजे सुंदरकांड सोबतच सजीव झाकी, सेल्फी बूथ, इत्र वर्षा व पुष्प वर्षा चे पण आयोजन करण्यात आले आहे. सोबतच सवामणी भोग चे आयोजन करण्यात आले आहे तरी ज्या भक्तांना सवामनी भोग अर्पण करायचा आहे त्यांनी मंडळ सोबत संपर्क करावा तसेच परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री वारि हनुमान मित्र मंडळ सुरत आयोजक व संग्रामपुर तालुक्यातील सहकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.