क्राईम
अवैध रेतीची वाहतुक करतांना ट्रक्टर पकडला तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांच्या पथकांची कारवाई
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात पुर्णा वान नदि नाल्यातुन रेतीचे उत्खलन करुन महसुल विभागावरच रेती माफीया करवी पाळत ठेऊन लोकेशन घेत अवैध रेती वाहतुक सुरु आहे महसुल विभागाचे कर्तव्यदक्ष तहसिलदार यांच्या विशेष पथकाने दि २५ मे रोजी सकाळी ९ वाजता चांगेफळ बु जळगाव जा रसत्याने अवैध रेतीच्या वाहतुक करतांना दुर्गेश परमेश्वर अढाव रा चांगेफळ बु यांच्या मालकीचे ट्रक्टर नविन पासिंग झालेले त्या मध्ये १ ब्रॉस अवैध रेती वाहतुक करतांना तहसिलदार टोंम्पे यांनी स्वता पकडले व पुढील कारवाई साठी नायब तहसिलदार हरिभाऊ उकर्डे , महसुल सहाय्यक के एच गवई , महसुल सहाय्य ए बी जाधव यांच्या ताब्यात ट्रक्टर देऊन तहसिलदार यांच्या आदेशान्वये ट्रक्टर तामगाव पोस्टेला जमा करण्यात आले अवैध रेती वाहतुक करतांना अचानक तेही सकाळी ९ वाजता तहसिलदार महसुलच्या विशेष पथकाने अवैध रेती वाहतुक करतांना ट्रक्टर पकडले यापुर्वी उपविभागीय शैलेज काळे यांच्या पथकाने एप्रिल महिण्यात अवैध रेती वाहतुक करतांना ट्रक्टर वर स्वता कारवाई केली होती