सातपुडा इंग्लिश मेडियम स्कूल वरवट (बकाल)चा 100 टक्के निकालाची परंपरा कायम पातुडर्याचे दोघांची बाजी वेदांत धर्माळ , जान्हवी राठी स्कुल मधुन प्रथम तर तालुक्यात व्दितीय

संग्रामपुर [प्रतिनिधी ] सातपुडा शिक्षण संस्था जळगाव (जा) द्वारा संचालित सातपुडा इंग्लिश मेडीयम स्कूल वरवट- बकालचा गेल्या पाचव्या वर्षा पासुन 100 टक्के निकाल लागल असून या वर्षीही कायम आहे त्यात पातुडर्यातील वेदांत गोपाल धर्माळ , व जान्हवी धुलीचंद राठी दोघांनी ९६%६० समप्रमाणात गुण घेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत बाजी मारली वेदांत धर्माळ मुला मधुन प्रथम आला तर जान्हवी राठी मुली मधुन सातपुडा ईग्लीश स्कुल मधुन प्रथम आली 43 विद्यार्थी परिक्षार्थी होते सर्वानी प्राविण्य प्राप्त श्रेणी (75% च्या वर मार्क्स ) घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.सातपुडा इंग्लिश मेडियम स्कूल च्या सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी स्कूल मध्ये नियमित ई लर्निंग शिक्षण, विषयानुसार सेमिनार, नियमित सराव पेपर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी संस्थेचे व्यवस्थापक सतत प्रयत्नात असतात.
वेदांत गोपाल धर्माळ याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले.यावेळी प्रथम क्रमांक चि.वेदांत गोपाल धर्माळ व जान्हवी धुलीचंद राठी या दोघांना 96.60% तर पूनम राधेश्याम इंगळे 94.80% व्दितीय , चंचल ओमप्रकाश दोरकर 94.00% हिचा तृतीय आली आहे.
यावेळी विद्यार्थी यांनी आपल्या यशाचे आपल्या पालकांसोबत प्राचार्य बी नायक शिक्षक गजानन उगले पंकज आमले, नयना मरोडे, धम्मापल दाभाडे, महेश सातव, प्रकाश ढगे, माधवी मानखैर व पंकज तायडे यांना देतात.
सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.कृष्णराव इंगळे, कोषाध्यक्ष डॉ.स्वातीताई वाकेकर, सी.ई.ओ. नितीन सातव, कार्याध्यक्ष डॉ.संदीप वाकेकर .प्राचार्य शिक्षक व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे कौतुक केले