विना परवाना अवैध ईंग्लीश दारु वाहतुक करतांना पकडली दुचाकी सह दारु जप्त सोनाळा पोलीसांची कारवाई
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी लाडणापुर रसत्यावर एका ॲटो गॅरेज समोर अवैध विना परवाना ईंग्लीश दारू वाहतुक करतांना दयालनगर येथील आरोपी पिंन्टु बहादरसिंग डावर याच्या कडून ईग्लीश दारु बॉटली सह दुचाकी ताब्यात घेऊन सदर आरोपी विरुध्द दारुबंदी कलम ६५ अ नुसार सोनाळा पोलीसांनी कारवाई केली याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील टुनकी लाडणापुर रसत्यावर दुचाकी क्र एम एच २८ बी एम ७६०७ एच एफ डिलक्स कंपणी च्या दुचाकीवर अवैध ईंग्लीश सुपर स्ट्राग बीअर ६५० एम एल च्या २४ काचेची बॉटल प्रत्येकी बॉटलची किंमत १७० रु एकुण चार हजार ऐन्शी रुपये दुचाकीची अंदाजे कि ४५००० हजार असे एकुण ४९०८० रुपायाचा मुद्देमाल सोनाळा पोलीसांना ताब्यात घेतला व आरोपी पिंन्टु बहादरसिंग डावर वय ३५ वर्ष रा दयालनगर याच्या विरूध्द विना परवाना अवैध दारु वाहतुक दारुबंदी कायदा अंतर्गत कारवाई केली सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार गवई करित आहेत